गालफुगी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

गालफुगी

गालगुंड, गालफुगी हा व्यापक प्रमाणात पसरणारा व्याधी असून जगामधे सर्वत्र आढळतो.



ह्या व्याधीमध्ये रोग्याच्या लाळग्रंथी ( Parotid Glands ) अचानक सुजतात.

साधारणतः शिशीर व वसंत ऋतुमधे गालगुंड, गालफुगी रोगाची साथ येते.

गालगुंड, गालफुगी रोग ५ ते १५ वर्षे वयाच्या मुलांमधे अधिक प्रमाणात आढळतो. परंतु कुठल्याही वयांमधे याची लागणं होऊ शकते. बालकांपेक्षा प्रौढ व्यक्तीमधे व्याधीची गंभीर लक्षणे निर्माण होतात. ९ महिण्यापेक्षा कमी वयाच्या बालकांना हा व्याधी सहसा होत नाही.

स्त्रियाच्या तुलनेने पुरुषामधे गालगुंड, गालफुगी रोग अधिक प्रमाणात होतो. एकदा हा व्याधी होऊन गेल्यानंतर सहसा पुनः होत नाही. कारण त्या रोग्याच्या शरीरात ह्या व्याधीविरुद्ध प्रतिकार शक्ति निर्माण होते. मोठया शहरामधे हा व्याधी जास्त प्रमाणात पसरतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →