गांधी नावाच्या संस्थांची यादी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

शिवाजी नावाच्या संस्था या लेखात शिवाजीचे नाव असलेल्या संस्थांची एक (अपूर्ण) यादी वाचता येईल. 'गांधी' घराण्यातले नाव असलेल्यासुद्धा अनेक संस्था भारतात आहेत. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अन्य गांधी यांच्या नावांवरून नामकरण झालेल्या संस्थांची यादी पुढे दिली आहे. भारत सरकारतर्फे चालवण्यात येणाऱ्या ५८ योजनांपैकी १६ योजना, राजीव या नावाने, आणि ८ योजना इंदिरा या नावाने पुनीत झाल्या आहेत. या बहुतेक सर्व सरकारी योजनांची नावे पुढील यादीत सापडतील. ही भविष्यातल्या लेखांची अनुक्रमणिका आहे असे समजावे.

अनेक कल्याणकारी योजना, संस्था आणि अगदी रस्ते, पूल आणि चौक यांनाही नेहरू-गांधी परिवारातील व्यक्तींची नावे देण्याची मक्तेदारी काँग्रेसने आजही (११ जुलै २०१३) पूर्णपणे राखली. आजच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघात फक्त महिलांसाठीच असलेल्या विद्यापीठाच्या स्थापनेचा निर्णय केला. तसेच राजीव गांधी यांच्या नावाने राष्ट्रीय हवाई वाहतूक विद्यापीठ स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. या दोन्ही ठरावांवर वर्तमानपत्रांनी सडकून टीका केली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →