गरीबपूरची लढाई भारत व पाकिस्तानमधील तिसऱ्या युद्धाची नांदी ठरलेली लढाई होती. नोव्हेंबर २०-२१, इ.स. १९७१ला झालेल्या या लढाईनंतर भारतीय सेनेने मुक्तीबाहिनीशी संधान बांधले व मित्रोबाहिनीची रचना केली. पुढील काही दिवसांत झालेल्या बोयराच्या लढाईत मित्रोबाहिनीने पूर्व पाकिस्तानात (आताचे बांगलादेश) असलेल्या पाकिस्तानी वायुसेनेच्या तुकड्यांचा पराभव केला व युद्धास तोंड फुटले.
गरीबपूर आणि बोयराच्या लढायांमध्ये पराभव पत्करलेल्या पाकिस्तानी सैन्यदलाने युद्धाच्या शेवटी भारतासमोर शरणागती पत्करली.
गरीबपूरची लढाई
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?