गया विमानतळ (आहसंवि: GAY, आप्रविको: VEGY) हा भारताच्या बिहार राज्यातील गया येथील एक विमानतळ आहे. ह्यास बोधगया विमानतळ असेही म्हणतात. येथील बव्हंशी प्रवासी वाहतूक ही गया जिल्ह्यातील बोधगया ह्या स्थानाकरिता असते. बोधगयेमध्ये गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले होते. ह्या विमानतळापासुन बोधगयेचे अंतर ५ कि.मी. आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गया विमानतळ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!