बोधगया

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

बोधगया

बोधगया हे भारत देशाच्या बिहार राज्यामधील एक ऐतिहासिक स्थान आहे. बिहारच्या गया जिल्ह्यात गया शहरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या बोधगया येथील महाबोधी मंदिरासाठी जगप्रसिद्ध आहे. येथील बोधी वृक्षाखाली बसून भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती असे मानण्यात येते. बोधगया, कुशीनगर, लुंबिनी व सारनाथ ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत.

२००२ साली महाबोधी मंदिराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थाने ह्या यादीमध्ये स्थान मिळाले. बोधगयेला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी गया विमानतळावर अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या सेवा पुरवतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →