गणेश हरी खरे (जन्म : १० जानेवारी १९०१; - ५ जून १९८५) हे महाराष्ट्रातील इतिहाससंशोधक होते. पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे ते क्यूरेटर , चिटणीस व नंतर अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. दक्षिणेचा मध्ययुगीन इतिहास, शिवकालीन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील दैवते, मूर्तिविज्ञान इ. विषयांवर त्यांनी संशोधनपर स्वरूपाचे विपुल लेखन केले आहे. तसेच मराठी, फार्सी इत्यादी भाषांतील ऐतिहासिक काळातील कागदपत्रांची संपादनेही केली आहेत. संशोधकाचा मित्र, मूर्तिविज्ञान, महाराष्ट्राची चार दैवते इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गणेश हरी खरे
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.