प्राचार्य गणेश हरि पाटील (जन्म : १९ ऑगस्ट १९०६; मृत्यू : १ जुलै, १९८९) हे एक मराठी कवी आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांच्या अनेक कविता मराठी शालेय पाठ्यपुस्तकांत असत.
ग.ह. पाटील हे बालसाहित्यिक होते. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी ’बालशारदा’ या ग्रंथाचे संपादन केले. त्या ग्रंथाला त्यांनी अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावनाही लिहिली होती. पुण्याच्या ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य असलेले पाटील, त्या कॉलेजमध्ये अध्यापन करताना सतत प्रयत्नशील आणि प्रयोगशील असत. लेखकांनी मुलांना सकस आणि आणि परिपूर्ण साहित्य यासाठी ग.ह. पाटील यांनी महिनाभराचे शिबिर त्यांनी १९६० मध्ये आयोजित केले होते. या शिबिरासाठी महाराष्ट्रभरातून होतकरू लेखक निवडले होते. शिबिराचा लाभ घेतलेले लेखक मुलांच्या क्षेत्रांत पुढे नावारूपाला आले. .
ग.ह. पाटील यांच्या कवितांचा संग्रह ’गस्तवाल्यांची गीते आणि निवडक कविता’ या पुस्तकाद्वारा प्रकाशित झाला आहे. पुस्तकाचे संपादन त्यांच्या कन्या डॉ. मंदा खांडगे यांनी केले आहे. पुस्तकाला शांता शेळके यांची प्रस्तावना आहे. ग.ह. पाटलांचा ’लिंबोळ्या’ या नावाचा एक कवितासंग्रह आहे, त्यात त्यांच्या बालकवितांशिवायच्या अनेक कविता आहेत.
गणेश हरि पाटील
या विषयावर तज्ञ बना.