प्रा. गणेश प्र. प्रधान (जन्म : गणेश चतुर्थी, २६ ऑगस्ट १९२२; - २९ मे २०१०) हे समाजवादी विचारवंत, राजकारणी व मराठी भाषेमधील लेखक होते.
ते १८ वर्षे पदवीधर आमदार होते; यांतील २ वर्षे ते विरोधी पक्षनेते होते. महाराष्ट्र विधान परिषदेचे ते हंगामी सभापती होते.
प्रधानांनी मराठी व इंग्रजीत विपुल प्रमाणात प्रासंगिक लेखन केले आहे. ते साधना साप्ताहिकाचे मानद संपादक होते. साने गुरुजींचे ते वारसदार समजले जातात. विविध सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असे.
गणेश प्रभाकर प्रधान
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.