गण

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

गण

गण या शब्दाचा संस्कृत आणि पाली भाषेतील अर्थ "कळप, दल, समूह, संख्या, जमात, श्रेणी, मालिका किंवा वर्ग" असा होतो. याचा वापर "परिचरांची संस्था" करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो आणि "एक कंपनी, समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तयार करण्यात आलेली कोणतीही मंडळी किंवा पुरुषांची संघटना" असा पण याचा अर्थ घेता येतो. "गण" हा शब्द धर्माच्या किंवा इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या परिषदा किंवा संमेलनांना देखील संदर्भित करू शकतो.



हिंदू धर्मात, गण हे शिवाचे सेवक आहेत आणि ते कैलास पर्वतावर राहतात. गणेशाला त्यांचा नेता म्हणून शिवाने निवडले होते, म्हणून गणेशाची उपाधी गणेश किंवा गणपती, अर्थात 'गणांचा स्वामी किंवा अधिपती' आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →