पुण्यातील गणेशोत्सव

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

पुण्यातील गणेशोत्सव

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात गणेशाचा उत्सव होत असल्याचे अभ्यासक नोंदवतात.



पेशव्यांच्या राजवटीत पुण्यात गणेशोत्सव हा त्यांचा वार्षिक समारंभ मानला जात असे. पुण्यातील गणेशोत्सवाची सुरुवात शनिवारवाड्यात पेशव्यांनी केल्याचे संदर्भ सापडतात. लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव सुरू केला आणि अनंत चतुर्दशीपर्यंत या उत्सवाचा काळ वाढविला. बिपीनचंद्र पाल यांनी या उत्सवाविषयी म्हणले आहे की "टिळकांचा हा उत्सव केवळ धार्मिक अनुष्ठान नसून स्वदेशसेवेचा हा सार्वजनिक महायज्ञ आहे."

प्रारंभीच्या वर्षी पुण्यात तीन ठिकाणी आणि मुंबईत दोन ठिकाणी असे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे झाले होते. या उत्सवाच्या आयोजनासाठी लोकमान्य टिळक यांना विरोधाला आणि संघर्षालाही तोंड द्यावे लागले आहे. पण त्यांच्या प्रेरणेतून हा उत्सव नागपूर, वर्धा, अमरावती येथेही सुरू झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →