गजानन कीर्तीकर ( ३ सप्टेंबर १९४३) हे एक भारतीय राजकारणी व १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. शिवसेनेचे वरिष्ठ सदस्य असलेल्या कीर्तीकर ह्यांनी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वायव्य मुंबई मतदारसंघामधून काँग्रेसचे तत्कालीन खासदार गुरुदास कामत ह्यांचा १.८३ लाख मताधिक्याने पराभव केला. किर्तीकर यांनी १२ नोव्हेंबर २०२२ साली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बाळासाहेबांची शिवसेना मध्ये प्रवेश केला. तर त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर यांनी मात्र आपल्या जुन्या पक्षातच राहणे पसंत केले आहे.
गजानन कीर्तिकर हे शिवसेना स्थानिक लोकाधिकार सेना या संघटनेचे अध्यक्ष आहेत. या संघटनेची स्थापना ९ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आली. संघटनेच्या कार्याध्यक्षपदी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना स्थानिक लोकाधिकार सेना ही मराठी भाषिक, भूमिपुत्र आणि स्थानिक युवकांच्या रोजगार, उद्योग-व्यवसायातील संधी तसेच त्यांच्या न्याय्य हक्कांच्या संरक्षणासाठी कार्य करणारी शिवसेनेची संघटना आहे. औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रात स्थानिकांना रोजगारात प्राधान्य मिळावे, कौशल्य विकासाला चालना मिळावी तसेच शासन, प्रशासन आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय साधून स्थानिकांच्या रोजगार व हक्कांशी संबंधित प्रश्नांवर पाठपुरावा करणे हे संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
गजानन कीर्तीकर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.