गँग्स ऑफ वासेपुर

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

गॅग्स ऑफ वासेपुर हा २०१२ चा भारतीय हिंदी भाषेतील दोन भागांचा गँगस्टर गुन्हेगारी चित्रपट आहे जो अनुराग कश्यप यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केला आहे. हा कश्यप आणि झीशान कादरी यांनी लिहिलेला आहे. धनबादमधील कोळसा माफिया आणि तीन गुन्हेगारी कुटुंबांमधील सत्ता संघर्ष, राजकारण आणि सूड यावर केंद्रित असलेल्या या चित्रपटात मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी, रिचा चड्डा, जयदीप अहलावत, हुमा कुरेशी आणि तिग्मांशू धुलिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याची कहाणी १९४१ ते २००९ पर्यंतच्या ६८ वर्षांची आहे.

दोन्ही भाग मूळतः एकूण ३२१ मिनिटांचा (५ तास, २१ मिनिट) एकच चित्रपट म्हणून चित्रित करण्यात आले होते आणि २०१२ च्या कान्स डायरेक्टर्स फोर्टनाइटमध्ये प्रदर्शित केले गेले होते. परंतु कोणतेही भारतीय थिएटर एवढा मोठा चित्रपट प्रदर्शित करण्यास इच्छुक नसल्याने, त्याचे दोन भाग झाले.

दोन्ही चित्रपटांना समीक्षकांची व्यापक प्रशंसा मिळाली आणि ते बॉक्स ऑफिसवर व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाले. गेल्या काही वर्षांत त्याच्या गडद विनोद, प्रायोगिक संगीत आणि त्याच्या वास्तववादी चित्रपट निर्मिती शैलीमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. २०१९ मध्ये, द गार्डियनने २१ व्या शतकातील १०० महान चित्रपटांमध्ये याला ५९ व्या क्रमांकावर सूचीबद्ध केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →