खैर

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

खैर

खैर(कात), (शास्त्रीय नाव: Acacia catechu, अकॅशिया कॅटिचू ; इंग्लिश: Black Catechu (ब्लॅक कॅटिचू), Mimosa catechu (मिमोसा कॅटिचू); संस्कृत खदिर) हा १५ मी. उंचीपर्यंत वाढणारा पानझडी, काटेरी वृक्ष आहे. चीन, आग्नेय आशिया, भारतीय उपखंड व हिंदी महासागराच्या परिघावरील भूभाग या प्रदेशांत हा निसर्गतः आढळतो. याच्यापासून काथ हा विड्याचा घटकपदार्थ बनवला जातो.

खैराचा आढळ प्रामुख्याने आशिया खंडातील भारत, चीन, पाकिस्तान, ब्रह्मदेश इत्यादी ठिकाणी असतो. या झाडाच्या कोवळ्या फांद्या िपगट रंगाच्या असतात. जून खोडाची साल करडी खरखरीत असते. पाने संयुक्त असून पिसासारखी दोन भागांत विभागलेली असतात. खैराची फुले पिवळ्या रंगाची असतात. त्यांना देठ नसतो. पानाच्या बगलेत किंवा कणसाच्या स्वरूपात पातळ, सपाट टोकाला निमुळत्या होत गेलेल्या शेंगा वृक्षावर येतात. या शेंगांमध्ये ३ ते ८ बिया असतात. खैराचे लाकूड कठीण आणि टिकाऊ असते. त्याला वाळवी लागत नाही. त्यामुळे त्याचा उपयोग लाकडी खांब, हत्यारे अवजारे, बासरी, होड्या इत्यादी वस्तू बनवण्यासाठी होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →