कळलावी (शास्त्रीय नाव: Gloriosa Superba, ग्लॉरिओसा सुपर्बा ; इंग्लिश: glory lily, ग्लोरी लिली, फ्लेम लिली, सुपर लिली) ही लिली प्रजातीतील एक वनस्पती आहे. ही वनस्पती आफ्रिका व आशिया खंडांमध्ये आढळते. ग्लोरिअस म्हणजे सुंदर फुले येणारी आणि ती सुंदर दिसते म्हणून सुपर्बा.
सुलभ प्रसूतीसाठी आदिवासी आणि पारंपरिक औषधी पद्धतीमध्ये मुळाचा लेप ओटी-पोटावर लावला जातो. बाळंतिणीला प्रसूतीच्या वेळी कळा आणण्यासाठी वापर होत असल्याने या वनस्पतीला "कळलावी" म्हणले जाते. कळलावीच्या फुलांच्या पाकळ्यांची टोके तांबडी व मधला भाग पिवळा असल्याने अग्निज्वाला असल्याचा भास होतो. अग्निज्वालाप्रमाणे असणाऱ्या या पाकळ्या दुरून समईत ज्योती तेवल्याप्रमाणे दिसतात, म्हणूनच या वनस्पतीला अग्निशिखा असेही म्हणतात.
फुलांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे या वेलीला अग्निमुखी, अग्निशिखा, कलहारी, खड्यानाग, गौरीचे हात, नखस्वामिका, बचनाग आणि अशी खूप नावे आहेत. फुले नसतानाही ही वेल तिच्या कुरळ्या कुरळ्या नखरेल पानांमुळे सहज ओळखू येते. हिच्या पानांना देठ नसतात. पाने साधी. पानांचा शिराविन्यास समांतर असून खोडावरील मांडणी एका आड एक लांबट शंकूच्या आकाराची, परस्परविरोधी, गुंडाळलेली, टोकदार असतात. पानांची टोके स्प्रिंगसारखी विळखे घेऊन पकड घेत घेत वर चढतात.
कळलावी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!