खेळियाड

या विषयावर तज्ञ बना.

खेळियाड Archived 2020-03-17 at the वेबॅक मशीन. (इंग्लिश Kheliyad Archived 2020-03-17 at the वेबॅक मशीन.) हा मराठी भाषेतील क्रीडा विषयाला वाहिलेला लोकप्रिय ब्लॉग आहे. खेळियाड मराठी शब्द असून, तो ऑलिम्पियाड (Olympiad) या शब्दापासून तयार झाला आहे. खेळियाड हा एक ब्लॉग आहे. क्रीडा क्षेत्रातील घडामोडी, खेळाडूंच्या प्रेरणादायी कहाण्या आणि क्रीडा क्षेत्रातील संबंधित विविध विषयांवर भाष्य करणारा मराठी भाषेतला लोकप्रिय ब्लॉग आहे. क्रीडा पत्रकार महेश पठाडे यांनी ३ जुलै २०१६ रोजी या ब्लॉगची सुरुवात केली. सुरुवातीला महेश पठाडे डॉट ब्लॉगस्पॉट या नावाने या ब्लॉगची सुरुवात करण्यात आली. २०१९ मध्ये या ब्लॉगचे खेळियाड हे अधिकृत डोमेननेम खरेदी करण्यात आले.

८०-९० च्या दशकात दूरदर्शनवर खेळियाड या नावाने एक प्रश्नमंजूषा कार्यक्रम असायचा. सुभाष अवस्थी आणि मिलिंद वागळे यांचे सादरीकरण या कार्यक्रमात असायचे. खेळाडूंशी संवाद साधल्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी दर्शकांना प्रश्न विचारला जायचा. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची ६०० धावांची विक्रमी भागीदारी अनेकांना माहित असेलच. या भागीदारीनंतर त्यांना या कार्यक्रमात बोलावले होते. ब्लॉग सुरू करताना अनेक नावांचा विचार झाला होता. मात्र, विस्मरणात गेलेले खेळियाड हे नाव महेश पठाडे Archived 2020-06-16 at the वेबॅक मशीन. यांनी निश्चित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →