खेरवाल सोरेन (जन्म ९ डिसेंबर १९५७) किंवा कालीपाद सोरेन हे संथाली भाषेतील नाटककार, लेखक आणि संपादक आहेत. ते राजकारणी देखील आहे.
पश्चिम बंगालमधील झारग्रामजवळील रघुनाथपूर येथे १९५७ मध्ये कालीपद सोरेन म्हणून जन्मलेल्या खेरवाल सोरेन यांनी सेवा भारती महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि रवींद्र भारती विद्यापीठातून राज्यशास्त्रात एमए उत्तीर्ण केले. खेरवाल जहर या साहित्यिक मासिकाचे ते नियमित संपादन करतात व त्यावरून ते खेरवाल सोरेन असे ज्ञात झाले. सोरेन यांनी संथाली भाषेत ३१ नाटके आणि अनेक कथा-कविता लिहिल्या आहेत. त्यांनी अनुभ या दिव्येंदू पालित यांच्या बंगाली कादंबरीचा संथालीमध्ये अनुवाद केला. त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल त्यांना शारदा प्रसाद किस्कू पुरस्कार मिळाला. २००७ मध्ये, सोरेन यांना त्यांच्या चेत रे सिकयाना या नाटकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. २०२२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांनी झारग्रामच्या लोकसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेस पक्षाकडून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकून पहिल्यांदाच खासदार बनले होते.
खेरवाल सोरेन
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?