खावली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे.
मौजे. खावली हे पश्चिम महाराष्ट्रातील 'सातारा'जिल्ह्यातील 'वाई'तालुक्यातील शे -दीडशे उंबरठ्याचे गाव सुमारे तीन विभागात हे गाव विभागले गेले असून त्याला वाड्या म्हणून संबोधले जाते. मुख्य वडवाडी, बागवाडी आणि पुढची वाडी, गावात मुख्य लोकं संख्या शेलार यांची, त्यानंतर चौधरी, आमले, नवघणे यांची काही घरे आहेत. गावची ग्रामदैवत ही श्री. नवलाई देवी व श्री. रामवरदायनी देवी असून. मार्गशिष पुष्य नक्षत्राला म्हणजेच डिसेंबर महिन्यात देवीची यात्रा भरते. खावली गावाची ओळख म्हटले तर श्री. नवलाई देवीचे गाव असेच आहे.
शिवाय छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची जिथे शपथ घेतली त्या रायरेश्वराच्या पायथ्याशी आणि केंजळगडाच्या पायथ्याशी हे गाव वसले आहे.
नायक, गंगाजल, स्वदेश, ओमकारा, तसेच अनेक मराठी आणि हिंदी, इंग्रजी अशा वेब सिरीज चे चित्रीकरण देखील खावली गावात आणि आजूबाजूच्या परिसरात झाले आहे. त्यामुळे पर्यटन, ट्रेकिंग च्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे.
खावली (वाई)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.