क्वीन (२०१४ चित्रपट)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

क्वीन हा २०१४मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. यात कंगना राणावतने मुख्य भूमिका केलेली असून लिसा हेडन आणि राजकुमार राव यांच्या सहाय्यक भूमिका आहेत. १२ कोटी खर्चून तयार केलेल्या या चित्रपटाने जगभरात १ अब्ज ८ कोटी रुपये मिळवले.

रानी नावाच्या पंजाबी मुलीच्या लग्नाची ही कथा आहे. होणाऱ्या नवऱ्याने लग्नास नकार दिल्यावर आत्मविश्वास गमावलेली रानी एकटीच मधुचंद्र साजरा करण्यासाठी पॅरिस आणि ॲम्स्टरडॅमला जाते आणि जगातील विविध अनुभव घेउन आत्मविश्वास परत मिळवून येते.

बुसान चित्रपट महोत्सवात पहिल्यांदा प्रदर्शित झालेला हा चित्रपट २०१४मधील सर्वोत्तम चित्रपटांतील एक समजला जातो. या चित्रपटाला २०१४चा फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार मिळाला. याशिवाय राणावतला सर्वोत्तम अभिनेत्री, विकास बहलला सर्वोत्तम दिग्दर्शक सह एकूण सहा फिल्मफेर पुरस्कार मिळाले. ६२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात क्वीनला सर्वोत्तम चित्रपट आणि राणावतला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.दुसरया देशात शूटिंग झाली

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →