क्रिस्टोफर रेन

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

क्रिस्टोफर रेन

सर क्रिस्टोफर रेन एफआरएस (३० ऑक्टोबर, १६३२ - ८ मार्च, १७२३) हे इंग्लिश स्थापत्यशास्त्रत्र, खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होते. यांना इंग्लंडच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध वास्तुविशारदांपैकी एक समजले जाते. हे त्यांच्या इंग्लिश बरोक शैलीतील कामासाठी विशेषतः प्रसिद्ध आहेत. १६६६ च्या लंडनच्या महाआगीनंतर लंडन शहरातील ५२ चर्चच्या पुनर्बांधणीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती,. त्यांनी बांधलेल्या चर्चमध्ये लुडगेट हिलवरील सेंट पॉल कॅथेड्रल हा सर्वोत्कृष्ट समजले जाते.



या चर्चच्या पुनर्बांधणीतील सर्जनशील कामे मुख्यत्वाने त्यांच्या हाताखालील स्थापत्यशास्त्राँनी, विशेषतः निकोलस हॉक्समूर यांनी केल्याचे श्रेय दिले जाते. रेनच्या इतर उल्लेखनीय इमारतींमध्ये रॉयल हॉस्पिटल चेल्सी, ओल्ड रॉयल नेव्हल कॉलेज, ग्रीनविच आणि हॅम्प्टन कोर्ट पॅलेसच्या दक्षिण भागाचा समावेश आहे.

रेन यांनीऑक्सफर्ड विद्यापीठात लॅटिन आणि ॲरिस्टोटेलीय भौतिकशास्त्रात शिक्षण घेतले. हे रॉयल सोसायटीचे संस्थापक होते आणि १६८० ते १६८२ या काळात तेथील अध्यक्ष होते. आयझॅक न्यूटन आणि ब्लेझ पास्कल यांनी त्यांच्या वैज्ञानिक कार्याचा गौरव केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →