क्रायोनिक्स (ग्रीक भाषेत क्रायोस, म्हणजे "थंड") हे कमी-तापमानावर अवयव किंवा पूर्ण शरीर गोठवण्याच्या प्रक्रियेला म्हणतात. ह्यात सामान्यत: −१९६ °से (−३२०.८ °फॅ; ७७.१ के) वर शरीर गोठवतात आणि भविष्यात पुनरुत्थान शक्य होईल या आशेवर मनुष्याचे अवशेष ठेवले जातात. मुख्य प्रवाहातील वैज्ञानिक समुदायाद्वारे क्रायोनिक्सला संशयास्पद मानले जाते. हे सामान्यतः छद्म विज्ञान म्हणून पाहिले जाते, आणि त्याची प्रथा फसवेगिरी म्हणून ओळखली जाते.
क्रायोनिक्स प्रक्रिया "रुग्ण" वैद्यकीय आणि कायदेशीररित्या मृत झाल्यानंतरच सुरू होऊ शकते. प्रक्रिया मृत्यूच्या काही मिनिटांत सुरू होऊ शकते, आणि गोठवतांना बर्फ तयार होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यासाठी क्रायोप्रोटेक्टंट्स वापरतात. विट्रिफिकेशन झालेल्या प्रेताचे पुनरुज्जीवन करणे शक्य नाही, कारण यामुळे मेंदूला नुकसान होते, त्याच्या न्यूरल सर्किट्ससह.
क्रायोनिक्स संरक्षणाचे प्रारंभिक प्रयत्न १९६० आणि १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला केले गेले. १२ जानेवारी १९६७ मध्ये गोठवलेले पहिले प्रेत जेम्स बेडफोर्डचे होते. २०१४ पर्यंत, अमेरिकेची संयुक्त संस्थानांमध्ये सुमारे २५० मृतदेह गोठवली गेली होते, आणि १५०० लोकांनी त्यांच्या अवशेषांच्या गोठवण्याची व्यवस्था केली होती.
आर्थिक दृष्ट्या क्रायोनिक्स कंपन्यांना हे परवडण्याजोगे नाही कारण "रुग्ण" स्वतः मृत असल्याने तो स्वतःचे अवशेष राखून ठेवण्यासाठी पैसे देऊ शकत नाही.
पुनरुत्थानासाठी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणारे नुकसान, क्रायोप्रोटेक्टंटचा विषारीपणा, थर्मल स्ट्रेस (फ्रॅक्चर) आणि काही अवयव जर नीट गोठले नाही; हे सर्व महत्त्वाचे घटक होतात. आणि त्यानंतर मुळ मृत्यूचे कारण पण दुरूस्त करणे आवश्यक आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये, विस्तृत ऊतक पुनरुत्पादन आवश्यक असेल. ह्या मुळे हे पुनरुज्जीवन तंत्रज्ञान संशयास्पद मानले जाते.
क्रायोनिक्स
या विषयावर तज्ञ बना.