कौन बनेगा करोडपती हा भारतीय दूरचित्रवाणीवरचा एक प्रसिद्ध हिंदी रियालिटी गेम शो आहे. प्रश्नमंजूषेचे स्वरूप असलेल्या या कार्यक्रमात विजेत्यास सात कोटी रुपयांपर्यंतचे बक्षिसे दिली जातात.
UK (युनायटेड किंग्डम)च्या प्रसिद्ध "Who Wants To Be Millionaire" मालिकेवरून प्रेरणा घेऊन हा कार्यक्रम भारतात निर्माण करण्यात आला. कार्यक्रमाच्या पहिल्या दोन मालिकांमध्ये अमिताभ बच्चन यांनी सूत्रसंचालन केले, तर तिसऱ्या मालिकेसाठी शाहरुख खान याची निवड करण्यात आली होती.चवथी मालिका पुन्हा अमिताभ बच्चनने सूत्रसंचालित केली..
या कार्यक्रमाची सुरुवात २००० साली झाली. अमिताभ बच्चन यांनी आपल्या कौशल्यावर या कार्यक्रमास नवीन उंचीवर नेले. त्या पहिल्या मालिकेत प्रथम अंकात अंतिम बक्षीस एक कोटी रुपये होते, तिसऱ्या मालिकेत ते ५ कोटी रुपये केले.
कौन बनेगा करोडपती
थोडक्यात पण महत्त्वाचे.