कोळमांडले

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

कोलमांडले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे.कोलमांडले गावाला ताराबंदर या नावाने संबोधले जाते.गावाच्या दक्षिणेकडील भागास फणसाड वन्यजीव अभयारण्य असून पश्चिमेला अरबी समुद्र आहे.या गावचे वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्व कोळी समाजाचे लोक फार वर्षानुवर्षे राहत आहेत.तसेच मासेमारी हा येथील प्रमुख आणि एकमेव व्ययसाय आहे.या गावाला सुंदर असा समुद्रकिनारा लाभला आहे.या गावात प्रामुख्याने सर्व कोळी बांधव राहत असल्याने नारळी पौर्णिमा,होळी,शिमगा हे सण मोठ्या उत्साहाने तसेच धुमधडाक्यात साजरे केले जातात.गावात जिल्हा परिषदेचे एक प्राथमिक विद्यालय आहे तसेच एक अंगणवाडीही आहे.गावात भव्य असे हनुमान मंदिर तसेच वेशिजवळ शंकर मंदिर व गावदेवी मंदिरही आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →