सुकाळी (वाशिम)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

सुकाळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एक गाव आहे.

सुकळी हे गाव पो. उकळीपेन, तालुका व जिल्हा वाशिम, पिन कोड 444505 येथे स्थित असून सुकळी ही स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. हे गाव सामाजिक एकोपा, सांस्कृतिक परंपरा आणि क्रीडा क्षेत्रासाठी ओळखले जाते.

सुकळी हे गाव कुस्ती खेळासाठी नावाजलेले आहे. दरवर्षी होळी सणाच्या निमित्ताने गावात कुस्तीचे सामने आयोजित केले जात होते. या कुस्ती स्पर्धांमुळे गावाची परिसरात विशेष ओळख निर्माण झाली असून गावातील युवकांमध्ये क्रीडाविषयक उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येतो होता.भौगोलिकदृष्ट्या सुकळी गावाच्या पूर्वेस पेनगंगा नदी आहे. पश्चिमेस साक्षात महादेवाचे मंदिर आहे. उत्तरेस सांडपाण्याचा ओढा आहे. दक्षिणेस स्मशानभूमी, आंबराई, तलाव आणि खोर क्षेत्र आहे. त्यामुळे गावाला नैसर्गिक साधनसंपत्तीचा लाभ मिळतो.

या गावात कोळी, पारधी, बौद्ध, मराठा, चांभार तसेच इतर समाजातील लोक वास्तव्यास आहेत. सर्व समाजांमध्ये सलोखा असून गावात सर्व समाजांची समाज मंदिरे आहेत. “एक गाव, एक गणपती” ही परंपरा गावात राबवली जाते, ज्यामुळे सामाजिक एकता अधिक दृढ होते.सुकळी गावात दुर्गादेवी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाच्या काळात संपूर्ण गाव एकत्र येऊन कार्यक्रम आयोजित करतो. तसेच भीमजयंती आणि शिवजयंती उत्साहाने साजरी केली जाते.

पारधी समाजामध्ये त्यांच्या पारंपरिक पद्धतीनुसार मराठी नववर्ष गुढीपाडवा साजरा केला जातो. या उत्सवामध्ये तीन दिवस देवीच्या नावाने जागरण केले जाते. ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. पारधी समाजातील लोक नितीनियम पाळून सर्व सोबत एकत्र राहण्याची परंपरा जपतात.

गावात मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याची टाकी आहे. प्राथमिक शाळा व अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. तसेच गावात किराणा दुकाने आणि १ ग्राहक सेवा केंद्र असून ग्रामस्थांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता होते.एकूणच सुकळी हे गाव क्रीडा, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा यांचे उत्तम उदाहरण असून सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल करणारे गाव आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →