कोल्लक्कयिल देवकी अम्मा (जन्म c. १९३४ ) या एक शेतकरी तथा निसर्गप्रेमी भारतीय महिला आहेत. त्यांचा अपघात झाल्यामुळे त्यांना शेती करणे शक्य होत नव्हते, सबब तेव्हापासून त्यांनी आपले लक्ष झाडे लावण्यावर केंद्रित केले. हळूहळू याचे ५ एकर हिरव्या जंगलात रूपांतरण झाले. या जंगलात ३,००० हून अधिक झाडे आहेत. देवकी अम्माच्या या कामासाठी त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात नारी शक्ती पुरस्काराचा देखील समावेश आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोल्लक्कयिल देवकी अम्मा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.