भारत देशाचे कोलकाता रेल्वे स्थानक हे पश्चिम बंगालच्या कोलकाता महानगरामधील एक लांब पल्ल्याचे रेल्वे स्थानक आहे. चितपुर रेल्वे स्थानक ह्या जुन्या नावाने ओळखले जाणारे हे स्थानक भारतीय रेल्वेच्या पूर्व रेल्वे क्षेत्राच्या सियालदाह विभागाच्या अखत्यारीखाली येते. हावडा रेल्वे स्थानक, सियालदाह रेल्वे स्थानक व शालिमार रेल्वे स्थानक ही कोलकात्यामधील इतर तीन प्रमुख स्थानके आहेत. कोलकाताचे उत्तर पूर्व बाजूस चितपूर विभागात कोलकाता रेल्वे स्थानक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोलकाता रेल्वे स्थानक
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.