कोमिनो

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

कोमिनो

कोमिनो तथा केम्मुना हे भूमध्य समुद्रातील माल्टा आणि गोझो बेटांमधील एक लहान बेट आहे. याचे क्षेत्रफळ ३.५ चौरस किमी (१.४ चौ. मैल) आहे. याला जिऱ्याचे (क्युमिन) नाव देण्यात आले आहे. या बेटावर फक्त दोन कायमस्वरुपी रहिवासी आहेत. यांशिवाय एक धर्मगुरू आणि एक पोलिस कर्मचारी रोज येथे कामासाठी येतात. हे बेट एक पक्षी अभयारण्य आणि नैसर्गिक राखीव जागा आहे.

या बेटाला प्राचीन ग्रीक काळात इफॅस्टिया असे नाव होते, रोमन काळात कोमिनोमध्ये शेतकऱ्यांची वस्ती असल्याच्या नोंदी आहेत. कोमिनोची किनारपट्टी खडकाळ असून मोठ्या भागात चुनखडीचे उंच कडे आहेत. बेटावर अनेक खोल गुहा आहेत. या मध्ययुगात समुद्री चाच्यांचे आणि लुटारूंचे नेहमीचे आसऱ्याचे ठिकाण होते. माल्टा आणि गोझो दरम्यान जाणाऱ्या होड्या आणि जहाजांवर छापे मारण्यासाठी कोमिनोच्या गुहा आणि खाड्यांचा वापर अनेकदा अड्ड्याच्या रूपात केला जात असे. १२८५ पासून १२९० नंतर काही काळापर्यंत, कोमिनो हे निर्वासित यहुदी स्वयंघोषित प्रेषित आणि कबालिस्ट अब्राहम अबुलाफिया याचे घर होते. कोमिनो येथेच अबुलाफियाने त्यांचे सेफर हा-ओट (चिन्हाचे पुस्तक) आणि त्यांचे शेवटचे पुस्तक, इमरे शेफर (सौंदर्याचे शब्द) लिहिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →