कोपनहेगन (डॅनिश: København) ही डेन्मार्क देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. स्यीलंड ह्या डेन्मार्कच्या सर्वात मोठ्या बेटाच्या पूर्व भागात ओरेसुंड आखाताच्या किनाऱ्यावर कोपनहेगन शहर वसले आहे. कोपनहेगन महानगराची लोकसंख्या २०१० साली १८,९४,५२१ इतकी होती.
११व्या शतकामध्ये वसलेले कोपनहेगन १५व्या शतकापासून डेन्मार्कचे राजधानीचे शहर आहे. २००० सालापासून ओरेसुंड पूलाद्वारे कोपनहेगन स्वीडनमधील माल्मो ह्या शहरासोबत जोडले गेले आहे, ज्यामुळे ह्या सबंध प्रदेशाचे कोपनहेगन हे महत्त्वाचे सांस्कृतिक, व्यापारी, वाहतूक व संशोधन केंद्र बनले आहे. वारंवार घेण्यात आलेल्या अनेक अहवालांनुसार राहणीमान दर्जाच्या बाबतीत कोपनहेगनमधील हे जगातील सर्वोत्तम शहरांपैकी एक मानले गेले आहे.
कोपनहेगन हे जगातील सर्वात हरित शहरांपैकी एक मानले जाते. येथील ३६% नागरिक रोज कामावर जाण्यासाठी सायकलचा वापर करतात.
कोपनहेगन
या विषयावर तज्ञ बना.