कॉन्ट्रा कोस्टा काउंटी (कॅलिफोर्निया)

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

कॉन्ट्रा कोस्टा काउंटी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक काउंटी आहे. सान फ्रान्सिस्को बे एरियामधील या काउंटीची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ११,६५,९२७ होती. या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र मार्टिनेझ शहर आहे. ही काउंटी ईस्ट बे प्रदेशाच्या साधारण मध्यात असून वॉलनट क्रीक, सान रमोन, डॅनव्हिल ही मोठी शहरे यात आहेत.

कॉन्ट्रा कोस्टाचा अर्थ स्पॅनिशमध्ये पल्याडचा काठ असा होतो. सान फ्रान्सिस्को शहरापासून खाडीपल्याड असल्यामुळे या प्रदेशाला हे नाव देण्यात आले. ही काउंटी सान फ्रांसिस्को-ओकलंड-बर्कली महानगराचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →