कॉन्ककॅफ गोल्ड चषक (CONCACAF Gold Cup; स्पॅनिश: Copa de Oro de la CONCACAF) ही फिफाच्या कॉन्ककॅफ ह्या उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका व कॅरिबियन ह्या भौगोलिक प्रदेशातील राष्ट्रीय पुरूष फुटबॉल संघांमध्ये खेळवली जाणारी एक फुटबॉल स्पर्धा आहे. दर दोन वर्षांनी ही स्पर्धा आयोजीत केली जाते. २०१५ पासून दोन गतविजेत्या संघांमध्ये एक बाद फेरीची लढत घेऊन त्यामधील विजेत्याला फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेसाठी आमंत्रित केले जाईल.
१९९१ सालापासून चालू असलेल्या कॉन्ककॅफ गोल्ड चषकामध्ये आजवर मेक्सिकोने ६ वेळा, अमेरिकेने ५ वेळा तर कॅनडाने एकदा अजिंक्यपद मिळवले आहे.
कॉन्ककॅफ गोल्ड चषक
या विषयावर तज्ञ बना.