के. कामराज

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

के. कामराज

कुमारसामी कामराज (तमिळ: காமராசர்; १५ जुलै १९०३ - २ ऑक्टोबर १९७५) हे भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यसेनानी राहिलेले कामराज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते होते.ते संविधान सभेचे सदस्य होते

१९५४ ते १९६३ दरम्यान तमिळनाडूचे मुख्यमत्रीपद व जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या कामराजांनी १९६७ साली इंदिरा गांधींनी काँग्रेस (आय) हा नवा पक्ष स्थापन केल्यानंतर उर्वरित काँग्रेस पक्षाचे नेतेपद सांभाळले. त्यांच्या मृत्यूनंतर १९७६ साली भारत सरकारने त्यांना भारतरत्‍न पुरस्कार दिला.

तमिळनाडूमध्ये प्रचंड लोकप्रियता कमावलेल्या कामराज ह्यांच्या आदराप्रित्यर्थ चेन्नईच्‍या अंतर्देशीय टर्मिनलला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →