के२

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

के२

के२ तथा छोगोरी किंवा माउंट गॉडविन ऑस्टेन हा पर्वत जगातील एव्हरेस्ट खालोखाल सर्वात उंच पर्वत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये काराकोरम पर्वतरांगेतील या पर्वताची उंची ८,६११ मी (२८,२५१ फूट) इतकी आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या बाल्टीस्तान भागात पाकिस्तान-चीन सरहद्दीवरील हे शिखर काराकोरम मधील सर्वोच्च शिखर आहे.

इटालियन गिऱ्यारोहक १९५४मध्ये आर्दितो देसियोच्या नेतृत्वाखालील काराकोरम मोहिमेंतर्गत लिनो लेसेडेली आणि अखिल काँपान्योनी यांनी हे शिखर पहिल्यांदा सर केले. पर्यंत २०१८ फक्त ३६७ व्यक्तींनी हे शिखर सर केलेले आहे. सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर १०,०००पेक्षा अधिक व्यक्तींनी सर केले आहे. अत्यंत अवघड आणि धोकादायक असे हे शिखर सर करणाऱ्या दर चार गिऱ्यारोहकांमागे एका गिऱ्यारोहकाचा पर्वतावरच मृत्यू होतो. तोपर्यंत ८७ व्यक्तींचा या पर्वतावर मृत्यू झाल्याची नोंद आहे.

या पर्वताला असलेल्या सगळ्या धारेवरून याचे शिखर सर झालेले आहे परंतु पूर्वेकडील कड्यावरून आत्तापर्यंत याच्यावर कोणीही सफल चढाई केलेली नाही. ८,००० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या पर्वतांपैकी असा हा एकमेव पर्वत आहे. सहसा या शिखरावर जुलै-ऑगस्टमध्ये चढाई केली जाते. वर्षातील इतर वेळी येथील हवामान अतिथंड आणि धोकादायक असते.

१६ जानेवारी, २०२० रोजी निर्मल पुर्जाच्या नेतृत्वाखाली १० नेपाळी गिऱ्यारोहकांनी हे शिखर पहिल्यांदा हिवाळ्यात सर केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →