केशवराव मारोतराव जेधे (२१ एप्रिल, इ.स. १८९६ - नोव्हेंबर १२, १९५९) हे मराठी राजकारणी, बहुजन समाजोद्धार चळवळीचे नेते होते. जेधे कुटूंब कान्होजी नाईक यांचे वंशज होते. केशवराव जेधे यांचा जन्म २१ एप्रिल, इ.स. १८९६ रोजी पुणे येथे झाला.
केशवरावांना तात्यासाहेब या नावाने ओळखले जाते. केशवराव जेधे यांचा संबंध ब्राह्मणेतर चळवळीशी होता. पुणे येथील जेधे मॅन्शन हे या चळवळीचे केंद्र होते. पुण्यातील प्रसिद्ध स्वारगेट चौक हे त्यांच्या नावावर आहे. केशवरावांनी शिवाजी मराठा हायस्कूल, पुणे येथे शिक्षकाची नोकरी केली. केशवराव जेधे यांनी छत्रपती मेळावा काढून टिळकांच्या शिवजयंतीला आव्हान दिले होते. त्यांनी "शांतीचा गांधी पुतळा। देशा प्यारा जाहला।" ही कविता लिहली.
जेधे हे पुण्यातील देशमुख वंशाचे एक सधन मराठा कुटुंब होते. कुटुंबातील सदस्य सत्यशोधक समाजाचे होते आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात सामाजिक कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. जेथे कुटुंबाकडे पुण्यात एक पितळ कारखान्याची मालकी होती. हा कारखाना जेधे यांच्या सर्वात मोठ्या भावाने चालविला होता. केशवराव सत्यशोधक समाजात सक्रिय कार्य करत असताना, त्यांचे एक भाऊ बाबुराव ब्राह्मणेतर चळवळीत सक्रिय होते. बाबुराव हे कोल्हापूर संस्थांचे छत्रपती शाहू महाराज यांचे निकटवर्तीय होते.
केशवराव जेधे
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.