केरोसीन किंवा रॉकेल हे एक ज्वालाग्राही हायड्रोजन व कार्बन यांचे संयुग द्रव आहे. हे एक इंधन आहे. रॉकेलचा उपयोग मोठ्या प्रमाणात विमानात जेट इंधन म्हणून केला जातो. काही वेळा अग्निबाण इंजिन मध्येही त्याचा उपयोग केला जातो. तसेच लहान मासेमारी नौका आणि जहाजाच्या आउटबोर्ड मोटर्सना इंधन म्हणूनही याचा उपयोग होतो. रॉकेल दिवे मोठ्या प्रमाणात प्रमाणात आशिया आणि आफ्रिका खंडांच्या ग्रामीण भागात वापरले जातात. रॉकेलचा ज्वलनांक बिंदू ३७° आणि ६५° सेंटिग्रेड दरम्यान आहे. रॉकेल पाण्यात मिश्रीत न होणारा पदार्थ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →केरोसीन
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.