निर्धूर चूल

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

निर्धूर चूल

लहान खिडक्या,धूर यामुळे कोंदटलेल्या घरांची आपल्याला सवय झालेली असते. मुख्यतः स्त्रियांना रोज प्रदूषणाला नाहक तोंड द्यावे लागते. जेथे आता रॉकेलचा किंवा गॅसचा वापर होतो तेथे धूराचा त्रास अर्थातच नसतो. पण लाकूडफाटा वापरला तरी धूर होणार नाही अशा बिनधुराच्या चुली उपलब्ध आहेत त्यांत कमी इंधनातून जास्त उष्णता मिळते. धुरामुळे घरात कीटकांचे प्रमाण कमी राहते असे काही जणांचे मत आहे. तरी निर्धूर चुली आवश्यक आहेत. मधून मधून कीटकांसाठी धूर करणे काही अवघड नाही.

ग्रामीण भागात घरगुती कारणासाठी लागणा-या एकूण उर्जेपैकी ८०% ऊर्जा स्वयंपाकासाठी वापरली जाते. खेडयातील लोक वर्षानुवर्षे चुली वापरत आहेत परंतु ह्या चुलींची कार्यक्षमता कमीच आहे. पारंपरिक चुलींच्या क्षमतेत १% जरी वाढ झाली तरी प्रतिवर्षी लाखो टन लाकूड वाचेल. जळणाच्या टंचाईमुळे चुलीमध्ये सुधारणा करून चुलींची कार्यक्षमता वाढवण्याचे व इंधनात बचत करण्याचे प्रयत्न संशोधकांनी सुरू केले आहेत.घरगुती आणि सर्व व्यवसायिक कार्यामध्ये ऊर्जा कार्यक्षमता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. दुर्लक्षित समूहामध्ये अनेक उर्जा कार्यक्षम उपकरणे मोठ्या प्रमाणात प्रसारित केली जात आहेत.या योजनेसाठी सन २०११ च्या जनगणनेनुसार दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबांची निवड करण्यात आली

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →