कॅले

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

कॅले

कॅले (फ्रेंच: Calais) हे फ्रान्स देशाच्या उत्तर भागामधील एक लहान शहर व प्रमुख बंदर आहे. कॅले इंग्लिश खाडीच्या डोव्हरच्या सामुद्रधुनीवर वसले असून येथून इंग्लंडमधील डोव्हर हे गाव केवळ ३४ किमी (२१ मैल) दूर आहे. १९९४ सालापूर्वी इंग्लंड व फ्रान्सला जोडणाऱ्या चॅनल टनेलच्या आधी कॅले हे ह्या दोन देशांमधील सागरी वाहतूकीचे केंद्र होते.

कॅलेच्या स्थानामुळे मध्य युग काळापासून ह्या शहराच्या अधिपत्यासाठी संघर्ष होत राहिला आहे. इ.स. १३४७ साली इंग्लंडचा राजा तिसऱ्या एडवर्डने कॅलेवर विजय मिळवला व पुढील २०० वर्षे कॅले इंग्लंडच्या अधिपत्याखाली राहिले. इ.स. १५५८ साली दुसऱ्या हेन्रीने कॅलेवर आक्रमण करून हे शहर पुन्हा फ्रेंचांकडे खेचून आणले. मे १९४० मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीने कॅलेवर बाँबहल्ला करून हे शहर संपूर्णपणे जमीनदोस्त केले होते.

आजच्या घडीला कॅले उत्तर फ्रान्समधील एक प्रमुख वाणिज्य व वाहतूक केंद्र आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →