कॅमेरॉन विल्बरफोर्स कॅमी स्मिथ (२९ जुलै, १९३३:बार्बाडोस - हयात) हा वेस्ट इंडीजकडून १९६० ते १९६२ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.
स्मिथने १९६०-६१ मध्ये वेस्ट इंडीज संघासोबत ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आणि ब्रिस्बेन येथील पहिल्या कसोटी सामन्यात सलामीवीर म्हणून कसोटी पदार्पण करताना ७ आणि ६ धावा केल्या. दुसऱ्या कसोटीतून त्याला वगळण्यात आले, परंतु तिसऱ्या कसोटीसाठी त्याने संघात पुनरागमन करत १६ आणि ५५ धावा केल्या. या दरम्यान त्यांनी फ्रँक वॉरेलसोबत ६७ मिनिटांत १०१ धावांची चौथ्या गड्यासाठीची शतकी भागीदारी रचली. या सामन्यात वेस्ट इंडीजचा २२२ धावांनी विजय झाला. ही त्यांच्या कसोटी कारकिर्दीतील एकमेव अर्धशतकी खेळी ठरली. या मालिकेतील उर्वरित दोन कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी २८, ४६, ११ आणि ३७ धावा केल्या. यातील एका डावात त्यांनी "फ्रँक मिसन यांच्या दुसऱ्याच चेंडूवर फाईन लेगच्या वरून षटकार ठोकला आणि त्यांनी हुंट यांच्यासोबत अवघ्या ५० मिनिटांत धावफलकावर ५० धावा लावून दिल्या."
स्मिथ यांनी १९६१-६२ च्या हंगामाची सुरुवात जमैकाविरुद्ध १२७ धावांची खेळी करत केली व त्यांनी हंट यांच्यासोबत पहिल्या गड्यासाठी २४४ धावांची भागीदारी रचली. {{cr}IND}}विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात त्यांनी १२ आणि ४ नाबाद धावा केल्या. तसेच या सामन्यात जॅकी हेंड्रिक्स यांच्या जागी यष्टीरक्षक म्हणून क्षेत्ररक्षण करताना त्यांनी रुसी सुरती यांना यष्टीचित केले. परंतु दुसऱ्या कसोटी सामन्यात ईस्टन मॅकमॉरिस यांच्यामुळे त्यांना आपली सलामीची जागा गमवावी लागली आणि त्यानंतर ते एकाही कसोटी सामन्यात खेळू शकले नाहीत.
१९६२-६३ मध्ये त्रिनिदाद विरुद्ध १४० धावा करत त्यांनी आपल्या सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येची बरोबरी केली. या सामन्यात त्यांनी सीमोर नर्स यांच्यासोबत दुसऱ्या गड्यासाठी ३१८ धावांची भागीदारी रचली. १९६४ च्या इंग्लिश हंगामाच्या शेवटी ते सर फ्रँक वॉरेल ११ संघासाठी तीन प्रथम श्रेणी सामने खेळले, तर १९६४-६५ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यापूर्वी भारतामध्ये राष्ट्रकुल ११ संघासाठी एक सामना खेळले. त्यांनी १९६५, १९६६ आणि १९६७ मध्ये इंग्लंडमधील इंटरनॅशनल कॅव्हॅलियर्स संघासाठी काही सामने खेळले.
स्मिथने निवृत्तीनंतर विमाविक्रेता नंतर म्हणून काम केले. नंतरच्या काळात त्यांनी वेस्ट इंडीजच्या अनेक संघांचे व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळली, तसेच १९९३ ते २००२ दरम्यान ४२ कसोटी सामने आणि ११८ एकदिवसीय सामन्यांमध्ये सामनापंच (मॅच रेफरी) म्हणून काम पाहिले.
कॅमी स्मिथ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.