डॉ. कृष्णराव पंढरीनाथ ऊर्फ शशिकांत देशपांडे (३ एप्रिल, इ.स. १९४१:वाडे, खेड तालुका, पुणे जिल्हा, महाराष्ट्र - ) हे एक मराठी लेखक आहेत.
देशपांडे हे पुणे विद्यार्थी गृहाच्या समाचार पत्रिकेचे व विद्यालय विशेषांकाचे चार वर्षे आणि पौड रोड ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रेरणा मासिकाचे ३ वर्षे संपादक होते. कोथरूड साहित्य संमेलनाची स्मरणिका काढण्यात त्यांचा सहभाग होता. अनेक संस्थांच्या वक्तृत्वस्पर्धांचे व निबंधस्पर्धांचे ते परीक्षक असत.
त्यांचे प्राथमिक शिक्षण वाडे गावात, माध्यमिक राजगुरुनगरला आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात स.प. महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे झाले. ते एम.ए. बी.एड. पीएच.डी. असून त्यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालयात ३१ वर्षे अध्यापक म्हणून काम करून, १९९७ मध्ये निवृत्ती घेतली. मृत्यू दिनांक 16 जून 2024.
कृ.पं. देशपांडे
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.