कृष्णावतारम पार्ट १

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

कृष्णावतारम पार्ट १: द हार्ट (हृदयम) हा २०२६ मधील भारतीय भक्तीपट आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हार्दिक गज्जर यांनी केले आहे आणि निर्मिती साजन राज कुरूप आणि शोभा संत यांनी क्रिएटिव्हलँड स्टुडिओ एंटरटेनमेंट आणि अथश्रीकथा मोशन पिक्चर्सच्या माध्यमातून केली आहे. कृष्णावतारम त्रयी मधील हा पहिला भाग असून यात सिद्धार्थ गुप्ता, संस्कृती जयना, सुष्मिता भट्ट आणि निवाशिनी कृष्णन यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाला प्रसाद एस. यांनी संगीत दिले असून छायाचित्रण अयानंका बोस यांनी केले आहे.

हा चित्रपट राम मोरी यांच्या २०२५ च्या 'सत्यभामा' या कादंबरीवर आधारित असून हिंदी, तेलुगू आणि तमिळ अशा तीन भाषेत प्रदर्शित झाला आहे. राधेच्या विरहानंतर श्रीकृष्ण त्यांच्या पत्नी रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्यासोबत जीवन जगतानाचे प्रसंग यात चित्रित केले आहेत. मुळात या चित्रपटाची संकल्पना ही सत्यभामेच्या दृष्टिकोनातून कृष्णाचे जीवन कसे घडत गेले यावर आधारित आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा ९ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात आली होती. सुरुवातीला तिन्ही भाषांमध्ये याचे शीर्षक श्री राधा रमणम असे होते, परंतु नंतर कृष्णावतारम भाग १: द हार्ट (हृदयम) असे याचे नामकरण झाले. हा चित्रपट ७ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित झाला आणि समीक्षकांकडून याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →