कृष्ण जन्माष्टमी (अर्थ: कृष्णाच्या जन्माचा प्रसंग) ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात, हा वार्षिक हिंदू सण आहे. श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.
विष्णूचा आठवा अवतार असलेल्या कृष्णाचा जन्म हिंदू चंद्र सौर दिनदर्शिकेनुसार, श्रावण या महिन्यात; तर ग्रेगोरियन कॅलेंडरच्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात हा सण येतो.
हा हिंदू धर्मातील विशेषतः वैष्णव पंथातील एक महत्त्वाचा सण आहे. भागवत पुराणानुसार कृष्णाच्या जीवनावर आधारित नृत्य-नाटक (जसे की रस लीला किंवा कृष्णलीला), मध्यरात्री भक्तीगीत गायन, उपवास, पूजा,रात्री जागरण आणि पुढील दिवशी महोत्सव यांचा जन्माष्टमी उत्सवामध्ये समावेश होतो.
कृष्ण जन्माष्टमीनंतर नंदोत्सव हा सण साजरा केला जातो. नंदाने जन्माच्या सन्मानार्थ लोकांना भेटवस्तू वितरित केल्या होत्या, त्याचा हा सण असतो.
कृष्ण जन्माष्टमी
या विषयावर तज्ञ बना.