कृष्णाजी केशव कोल्हटकर

या विषयावर तज्ञ बना.

कृष्णाजी केशव कोल्हटकर (१४ जानेवारी, इ.स. १८८३:सातारा, महाराष्ट्र - २६ एप्रिल, इ.स. १९७५:पुणे, महाराष्ट्र) हे एक मराठी वेदान्ती आणि योगशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांचा जन्म साताऱ्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. इंटर आर्ट्‌सपर्यंत शिक्षण घेतल्यावर डोळे बिघडल्यामुळे त्यांना पुढे शिकता आले नाही. म्हणून त्यांनी सातारा येथे जिल्हा न्यायालयात १९०१ साली कारकुनाची नोकरी धरली. १९१३ साली ही नोकरी सोडून ते त्यावेळी नुकत्याच स्थापन झालेल्या वेस्टर्न इंडिया लाईफ इन्शुरन्स कंपनीत लागले.

कोल्हटकरांचे एक चुलते गणेश राघो कोल्हटकर हे योग आणि वेदान्त ह्या शास्त्रांचे अभ्यासक होते. ते सातारा येथील दिवाणी न्यायालयात क्लार्क ऑफ दि कोर्ट या हुद्द्यापर्यंत पोचले होते. इ.स. १९०७मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर वाई येथील प्राज्ञपाठशाळेचे संस्थापक नारायणशास्त्री मराठे यांजकडे त्यांनी वेदान्तशास्त्राचा अभ्यास केला. कृष्णाजी केशव कोल्हटकरांना या चुलत्यांचे मार्गदर्शन मिळाले.

इ.स. १९३७मध्ये कृष्णाजी कोल्हटकर हे वेस्टर्न इंडिया लाईफ इन्शुरन्स कंपनीतून निवृत्त झाल्यावर आणि त्यांनी आपला अधिक वेळ वेदान्त आणि योग यांच्या अभ्यासात आणि त्यासंबंधी लेखनात गुंतविला.

योगदर्शन या ग्रंथाने कोल्हटकरांना प्रसिद्धी मिळाली. भारत सरकार, महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि अनेक सार्वजनिक संस्थांकडून त्यांचा गौरव झाला. पुणे विद्यापीठाने त्यांना ९ जुलै १९७२ रोजी डॉक्टर ऑफ लिटरेचर ही मानद पदवी प्रदान केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →