कृष्णा किरवले

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

डॉ. कृष्णा रामभाऊ किरवले (४ मे, इ.स. १९५४; ३ मार्च, इ.स. २०१७:कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत) हे: महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, साहित्यिक व शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख होते. किरवले हे मूळचे बीड जिल्ह्यातील टाकळी आचार्य (ता. परळी वैजनाथ) गावचे होते. नोकरीनिमित्ताने ते सोळा वर्षांपूर्वी कोल्हापूरला आले.

डॉ. किरवले यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झाले. तिथेच १९८०ला ते एम.ए. झाले. पुढे १९८७ला त्यांनी दलित शाहीर व त्यांची शाहिरी या विषयावर पीएच.डी. केली. पुण्यातील गरवारे वाणिज्य महाविद्यालयातून १९८७ पासून साहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापनाचे काम सुरू केले. त्यानंतर पुणे विद्यापीठातही काम केले. पुढे २००२मध्ये ते शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागात रुजू झाले. मराठी विभागाचे ते दोन वेळा प्रमुख होते. विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचेही संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. दलित आणि ग्रामीण शब्दकोश निर्मितीत त्यांनी योगदान केले. त्यांनी आंबेडकरी चळवळ, शाहिरी या विषयांवर दहा ग्रंथांचे लेखन केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →