कुणकवण हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील गाव आहे. हे गाव राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील खारेपाटण गावापासून अंदाजे १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. कुणकवण व फणसगाव या दोन गावांच्या दरम्यान कोर्ले-सांतडी हे धरण आहे.
गावामध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत. गावचे ग्रामदैवत श्री गांगेश्वर आहे. तसेच गावात श्री रामेश्वर मंदिर ही आहे. हे गाव महाराष्ट्राचे माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे गाव आहे. गावाकडे येणारे व गावाच्या वाडीतील रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहे. येथून जवळ शेंडया डोंगर हा डोंगर आहे.
कुणकवण
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.