किझील लेणी (इंग्रजी: Kizil Caves) चीनी सरकारच्या नियंत्रणाखालील शिंच्यांग प्रांतातील एक बौद्ध लेणींचा समूह आहे जेथे प्राचीनकाळातील तारीम द्रोणीत तुषारी लोकांच्या आणि बौद्ध धर्माच्या संबंधित चित्र, मूर्ती, लेखन व अन्य पुरातन वस्तू मिळाल्या आहेत. ह्या लेणी शिंच्यांग प्रांताच्या आक्सू विभागाच्या बाईचेंग जिल्हामध्ये मुजात नदीच्या उत्तर काठावर कूचा पासून ६५ कि.मी. दूर स्थित आहे. हा प्रदेश ऐतिहासिक रेशिम मार्गावर स्थित होता आणि इसवी सनाच्या तिसऱ्या ते आठव्या शतकादरम्यान विकसित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →किझील लेणी
या विषयावर तज्ञ बना.