किक हा २०१४ चा भारतीय हिंदी भाषेतील अॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे जो साजिद नाडियाडवाला यांनी नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट बॅनर अंतर्गत दिग्दर्शीत केला आहे. ह्यात सलमान खान, जॅकलीन फर्नांडिस, रणदीप हूडा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा ह्याच नावाच्या २००९ च्या तेलुगू चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे.
रजत अरोरा यांनी या चित्रपटाची कथा लिहिली होती, तसेच नाडियादवाला, चेतन भगत आणि कीथ गोम्स यांच्यासोबत पटकथाही लिहिली होती. हा चित्रपट यूटीव्ही मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने ५५ कोटी (US$१२.२१ दशलक्ष) च्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. २५ जुलै २०१४ रोजी ईदच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने ४०२ कोटी (US$८९.२४ दशलक्ष) पेक्षा जास्त कमाई केली.
२०१४ मध्ये प्रदर्शित झाल्यापासून ते २०२४ पर्यंत, किकने एका दशकाहून अधिक काळ, टॉप ५० सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये स्थान कायम ठेवले आहे.
किक (२०१४ चित्रपट)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.