किंकरी देवी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

किंकरी देवी (१९२५ - ३० डिसेंबर २००७) ह्या एक भारतीय सामाजिक कार्यकर्ती आणि पर्यावरणवादी होत्या.त्यांचा जन्म हिमाचल प्रदेश मधील असून तेथे होणाऱ्या बेकायदेशीर खाण आणि उत्खननाविरोधात आंदोलन करण्यासाठी त्या प्रसिद्ध होत्या. किंकरी देवी अशिक्षित असून त्यांना लिहिता-वाचता येत नव्हते. परंतु त्यांच्या मृत्यूपूर्वी काही वर्ष आधी आपली स्वाक्षरी कशी करावी हे त्यांनी शिकून घेतले होते.

किंकरी देवी ह्या अत्यंत हलाखीचे जीवन जगत असताना त्यांच्या गरिबीची बातमी एका पंजाबी भाषिक वृत्तपत्रात छापून आली होती. ही बातमी हिमाचल प्रदेशातील एका अमेरिकन धर्मादाय संस्थेला जेव्हा वृत्तपत्रातुन वाचण्यात आली, तेव्हा त्यांनी किंकरी देवींना योग्य ती मदत करून त्यांची गरिबी कमी केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →