काश्मिरी हंगूल

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

काश्मिरी हंगूल

काश्मिरी हंगुल तथी काश्मिरी स्टॅग (शास्त्रीय नाव: सेर्व्हस हंग्लु हंग्लु) हा हरिण प्रजातीतील एक दुर्मिळ आणि लुप्तप्राय प्राणी आहे. हा प्राणी प्रामुख्याने भारताच्या जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील दाचीगाम राष्ट्रीय उद्यानात आढळतो. हंगुल हे जम्मू आणि काश्मीरचे राज्यप्राणी आहे आणि ते हिमालयाच्या उंच आणि थंड प्रदेशातील जैवविविधतेचे एक महत्त्वाचे प्रतीक मानले जाते.

हंगुलच्या अंगावरील पिवळसर किंवा तपकिरी रंगाचे दाट केस आणि त्यांच्या शिंगांची विशिष्ट रचना त्यांना इतर हरिण प्रजातींपासून वेगळे करते. अधिवासाचा ऱ्हास, शिकारीचे प्रमाण आणि मानवी हस्तक्षेपांमुळे या प्राण्यांच्या संख्येत मोठी घट झाली असून, ते आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाच्या रेड लिस्टमध्ये गंभीरपणे संकटग्रस्त म्हणून नोंदवले गेले आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी भारत सरकार आणि जम्मू-काश्मीर प्रशासन अनेक प्रयत्न करत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →