कालिंपाँग जिल्हा

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

कालिंपाँग जिल्हा हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा आहे. मूलतः दलिंगकोट तहसील म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश पर्यायाने सिक्कीम आणि भूतानच्या नियंत्रणाखाली होता.१८६५ मध्ये, सिंचुला करारानुसार हा भाग भूतानकडून ब्रिटिश भारतात जोडला गेला व १९१६ ते २०१७ पर्यंत दार्जिलिंग जिल्ह्याचा उपविभाग म्हणून प्रशासित केले गेले. २०१७ मध्ये, तो स्वतंत्र जिल्हा म्हणून कोरण्यात आला व पश्चिम बंगालचा २१ वा जिल्हा झाला.

जिल्ह्याचे मुख्यालय कालिंपाँग येथे आहे, जे ब्रिटिश काळात इंडो-तिबेट व्यापारासाठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध झाले. याच्या उत्तरेला सिक्कीमचा पाक्योंग जिल्हा, पूर्वेला भूतान, पश्चिमेला दार्जिलिंग जिल्हा आणि दक्षिणेला जलपाईगुडी जिल्हा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →