कारीमाता सामुद्रधुनी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

कारीमाता सामुद्रधुनी, कारिमाता सामुद्रधुनी, कॅरिमाटा सामुद्रधुनी, कॅरामाटा सामुद्रधुनी तथा सेलात कारीमाता (इंडोनेशियन: Selat Karimata ) ही जावा समुद्र आणि दक्षिण चिनी समुद्रांना जोडणारी सामुद्रधुनी आहे. या दोन समुद्रांधील ती सामुद्रधुन्यांपैकी सगळ्यात रुंद असून उथळ आहे. याच्या पश्चिमेला इंडोनेशियाचा बेलितुंग द्वीपसमूह आणि पूर्वेला बोर्निओ (कालीमंतन) आहेत. ही सामुद्रधुनी रुंद असली तरीही त्यातील असंख्य बेटे प्रवाळी खडकांमुळ यातून वाहतूक करणे अवघड आहे.

रॉयल नेव्हीने डच ईस्ट इंडीजमध्ये केलेल्या १८११ च्या जावावरील आक्रमणासाठी या सामुद्रधुनीचा वापर केला होता. २०१४मध्ये इंडोनेशिया एरएशिया फ्लाइट ८५०१ येथे कोसळली होती..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →