कामरूप मेट्रोपॉलिटन जिल्हा

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

कामरूप मेट्रोपॉलिटन जिल्हा किंवा कामरूप महानगर जिल्हा हा ईशान्य भारतातील आसाम राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी एक आहे. २००३ मध्ये पूर्वीच्या अविभाजित कामरूप जिल्ह्यातून याची निर्मिती करण्यात आली. याचे क्षेत्रफळ गुवाहाटी महानगर विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीतील क्षेत्राएवढे आहे. गुवाहाटी मेट्रो जिल्ह्यातील दिसपूर विधानसभा मतदारसंघ हे आसाममधील सर्वात मोठा मतदारसंघ आहे, ज्यात ३.५३ लाख मतदार आहे.

पूर्वीच्या कामरूप जिल्ह्याचे विभाजन करून ३ फेब्रुवारी २००३ रोजी या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.

तरुण गोगोई यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात, आसाम सरकारने त्याचे आणखी विभाजन करून पूर्व कामरूप नावाचा नवीन जिल्हा तयार करण्याचा प्रस्ताव दिला होता. २०१६ मध्ये, जिल्हा निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. परंतु त्याच वर्षी, पायाभूत सुविधांच्या अभावामुळे निर्मितीची प्रक्रिया मध्येच थांबवण्यात आली.

जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय गुवाहाटी शहरात आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १५२७.८४ चौरस किलोमीटर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →