काम हे हिंदू धर्मात दिलेल्या चार पुरुषार्थांपैकी एक आहे. इतर तीन अर्थ, धर्म आणि मोक्ष आहेत. यांना मानवाच्या शोधातील मनुष्याचे मुख्य उद्दिष्ट समजले जाते. याचा शब्दशः अर्थ आनंद, परमसुख असा होतो. प्रामुख्याने काम म्हणजे आनंद किंवा कामुक्ता असे समजले जाते. पण हे यापेक्षाही अधिक आहे, यामध्ये कला,संगीत, प्रेम आणि अंतरंगाचा समावेश होतो. हिंदू धर्मानुसार पूर्ण जीवनाचा काम ही एक महत्त्वपूर्ण अंग आहे. काम ही मनुष्याच्या अंतरंगात होणारी एक इच्छा आहे जी प्राप्त करण्यासाठी तो उत्सुक असतो आणि त्यानुसार आपले कर्म देखील करतो आणि हीच इच्छा मनुष्याच्या जीवन उद्देशांसोबत जोडली जाते. काम ही एक अशी भावना आहे ज्यामध्ये मनुष्य आनंदाच्या शोधात असतो त्याबद्दल तो बरेच काही शिकतो, त्याच्या भावना सुद्धा त्या सोबत जोडल्या जातात. ही एक आनंदाची प्रक्रिया असून अनुभवा आधी दरम्यान व नंतर असणारी एक कल्याणकारी भावना आहे आणि यामध्ये जे काही आपण आपल्या इंद्रिया मार्फत अनुभवतो त्यामध्ये पूर्णपणे उपस्थित असणे हे होय. याचा उद्देश आपल्या इच्छापूर्तीसाठी असतो यामधून आपल्याला समाधान व संतुष्टी प्राप्त होते. या पासून समाधान मिळणे हे मनुष्याचे उद्दिष्ट असले पाहिजे नाकी त्यामध्ये फसून त्याला सर्वस्व बनवणे नाही. काम हा मनुष्याला मनुष्याला व्यक्ती जीवनामध्ये आनंद सुख शांती मिळवण्याचा एक यज्ञ आहे. कामाबद्दल वात्स्यायन यांच्या कामसूत्र या ग्रंथामध्ये विस्तारपणे लिहिले आहे. परंतु त्याला एक लैंगिक सुखासाठीचे मार्गदर्शक पुस्तक असे समजले जाते, परंतु यामध्ये पवित्र, शालिन जीवनाचे मार्गदर्शन आहे यामध्ये प्राकृतिक प्रेम, पारिवारिक जीवन आणि मानवी जीवनाच्या आनंददायक कार्याचे वर्णन केले आहे हे पुस्तक काम देव किंवा रतिला समर्पित नसून ते विद्येच्या देवी सरस्वतीला समर्पित केलेले आहे
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →काम (धर्म)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.